रचना क्र. 475
श्री ज्ञानेश्वरीची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय ज्ञानेश्वरी अवतरे नेवासे गावी ।
भावार्थाची दिव्य दीपिका गीतार्था फुलवी ॥धृ॥
उपनिषदांतिल शाश्वत जीवन ।
सूत्रे आचाराची पावन ।
बोध कृष्णवाणीतुन ऐकुन ।
धन्य होतसे योद्धा अर्जुन ।
देव माउलीरुपे येउन बोध सुगम दावी ॥१॥
दुर्लभ वाणी सामान्यांना ।
कल्याणाचा मार्ग कळेना ।
जाणे माउलि अज्ञ जिवांना ।
उलगडले त्या दिव्य ज्ञाना ।
दीन म्हणे ही मराठीतली कृपा नित्य ध्यावी ॥२॥
