रचना क्र. 472
श्री शंकर महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय श्री शंकर महाराज शिव, धनकवडीवासी ।
दत्तगुरू श्री स्वामिसमर्था, सर्व तूचि होशी ॥धृ॥ समर्था ...
अवतरशी तू अयोनिसंभव, देहवेष घेशी ।
देवभक्तकार्यांच्यासाठी, क्षणी आज येशी ॥१॥ समर्था ...
अज्ञसुज्ञ उद्धरण्या सर्वां, सगुणरूप धरिशी ।
आत्मज्ञाने, गूढ वर्तने, ज्यास तसे देशी ॥२॥ समर्था ...
स्थूलसूक्ष्म दिक्काल लीलया, ओलांडुन जाशी ।
आर्त प्रार्थना दीनजिवांची, राखी पायाशी ॥३॥ समर्था ...
