रचना क्र. 470
देवांची भूपाळी
श्री पेठेकाका · null
null
दर्शनकांक्षा धरुनी चित्ती, हाक देउया हळू ।
दीप मनाचे उजळुनि देवा, काकडा ओवाळू ॥ देवा काकडा ओवाळू ॥धृ॥
बालरूप तुम्ही, तुम्हीच माता, तुम्ही पिता, त्राता ।
असेल जर झाली विश्रांती, दर्शन द्या आता ॥१॥ देवा दर्शन द्या आता..
जागृत देवा नित्य निरंतर, तुम्हा न दिनरजनी ।
आशीर्वच द्या दीनभक्ता,राहो स्मरण मनी ॥२॥ तुमचे राहो स्मरण मनी..
