रचना क्र. 465
आनंदघनसागरू
श्री नंदन · null
null
आनंदघनसागरू, सद्गुरू ॥धृ॥
निरिच्छता अन् निर्वासनता,
यांचा तू आगरू ॥१॥
भावभक्तिचा संगम होशी,
जैसा कल्पतरू ॥२॥
स्वरुप हे तव न कळे कोणा,
आता काय करू ॥३॥
तुझे रूप हे गवसे अलगद,
पाहू प्रेमभरू ॥४॥
जीव पोरका होउनि गेला,
चरण तुझे मी धरू ॥५॥
व्यर्थ वाटे जिणे इतरसे,
तू भक्तीअंबरू ॥६॥
भेट तुझी ही सगुण लाभली,
गमवू का क्षणभरू ॥७॥
पामर गणुला कृपे दाविशी,
अंतरि आत्मगुरू ॥८॥
