रचना क्र. 454
जीवीचिया जिवा
श्री ज्ञानेश्वर महाराज · null
null
जीवीचिया जिवा, प्रेमभावाचिया भावा ।
तुजविण केशवा, कुणि नावडे ॥ धृ ॥
जीवे अनुसरलिये, अजुनी का न ये ।
वेगी आणावा सये प्राणु माझा ॥ १ ॥
सौभाग्यसुंदरु, लावण्यसागरु ।
बापरखुमादेवीवरु, श्री विठ्ठलु ॥ २ ॥
