रचना क्र. 437
श्री तात्यासाहेब केतकर महाराजांची आरती
श्री पेठेकाका · null
null
जय जय जय आरती श्री गुरु तात्यांचे चरणी ।
अमित, आर्त जिज्ञासूंसाठी झिजे ब्रह्मवाणी ॥ धृ॥
शरणागतिचे अपूर्व वारस, त्यात शुद्ध चित्त ।
नाम असो, निर्वाह, विवाह, गुरुआज्ञा व्रत ॥
जसे जिथे नेतील सद्गुरू, जावे समवेत ।
तेचि तेचि हित, निष्ठा जगला अवघ्या जन्मात ॥१॥
‘महाराज’ या एकच विश्वी, झाला तादात्म्य ।
आत्मानुभवी कृपे जाहला, नसे बुद्धिगम्य ॥
दीनांठायी भावचि केवळ, नसे इतर गम्य ।
तरी, देवसोहळा तव कृपे लाभो अनुपम्य ॥२॥
