रचना क्र. 435
उदंड दिधले दान
श्री पेठेकाका
उदंड दिधले दान (देवा) ।
एक द्या, जाणिवेचे वरदान ॥धृ॥
दिधले श्रवण, दिधले नयन ।
अम्हास नुरले भान, कशास्तव ॥१॥
दिधली शक्ती, अपूर्व बुद्धी ।
अम्हास नुरले भान, कशास्तव ॥२॥
देह हे साधन, अद्भुत जीवन ।
अम्हास नुरले भान, कशास्तव ॥३॥
कृतज्ञ होवो, दिनदिन वर्तन ।
अम्हास नुरले भान, कशास्तव ॥४॥
