रचना क्र. 373
तोचि खरा कैवारी
श्री पेठेकाका · null
null
तोचि खरा कैवारी ।
तिष्ठतसे विटेवरी ॥धृ॥
जन्मोजन्मी वाट पाहे ।
तोचि त्याचे दु:ख वाहे ॥१॥
अपराधां करी क्षमा ।
वरी देई नव्या जन्मा ॥२॥
मायाभुली दूर जाता ।
संतरूप धाडी दूतां ॥३॥
दीन म्हणे आता चुकणे ।
नको तुम्हा दूषण येणे ॥४॥
