रचना क्र. 367
सुखे संसार करावा
श्री स्वामीसुत महाराज · null
null
सुखे, संसार करावा ।
त्यात करा स्वामी-सेवा ॥धृ॥
संसार पाहुण्याचे परी ।
करुनि, भजा त्या अंतरी ॥१॥
नित्य दर्शनासी यावे ।
स्वामीचरण भावे पहावे ॥२॥
मूल सासुर्यासी राहे ।
वेळोवेळी आठवी माये ॥३॥
तैसे चित्त सर्व प्राणी ।
दृढ ठेवा स्वामीचरणी ॥४॥
आणि नाम जीवे भावे ।
त्यांचे सर्वत्रांनी घ्यावे ॥५॥
संसारी असोनी तो नाही ।
अंती जाईल स्वामीपायी ॥६॥
त्यासी नाही यातायात ।
सत्य सांगे स्वामीसुत ॥७॥
