रचना क्र. 324
सुखसहिता दुखरहिता
श्री रामदास स्वामी · null
null
सुखसहिता दुखरहिता निर्मळ एकांता ।
कलिमलदहना गहना स्वामी समर्था ।
न कळे ब्रह्मादिका अंत अनंता ।
तो तू आम्हा सुलभ जय कृपावंता ॥१॥
जयदेव जयदेव जय करूणाकरा ।
आरती ओवाळू सद्गुरुमाहेरा ॥ धृ ॥
मायेविण माहेर विश्रांती ठाव ।
शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव ।
सद्गुरुप्रसादे सुलभ उपाव ।
रामी रामदासा फळला सद्भाव ॥२॥
