रचना क्र. 322
श्री तुकोबांची आरती
श्री पेठेकाका · null
null
ओवाळूया श्री तुकोबांना ।
जय, जय तनमनपावना ।
देवभक्तांच्या जीवना ।
आम्हा भक्तांच्या जीवना ॥धृ॥
जगजनात राहूनी ।
अवघे विपरीत साहूनी ।
संसाराची मजुरी करुनी ।
जोडियेले भक्तीधना ।
जोडियेले विठ्ठलधना ॥१॥
मद भ्रम केले दूर ।
भेद पाखंडा प्रहार ।
कोठे व्हावे कृपण, उदार ।
हाती दिले मर्मज्ञाना ।
हाती दिले ब्रह्मज्ञाना ॥२॥
साधकाची जपुनी दशा ।
कशी टाकावी ती आशा ।
मान कैसा अव्हेरावा ।
डोळा घातले अंजना ।
जगा लावीले भजना ॥३॥
दावियेले स्वहित कशात ।
साधनांची काय मात ।
दीनां गाथा हे अमृत ।
गाठी कैसे नर, नारायणा ।
याच जन्मी नारायणा ॥४॥
