रचना क्र. 319
श्री देवीची आरती
श्री पेठेकाका · null
null
जगज्जननि हे जय जय माते, भावारति घेई ।
कृतज्ञतेने तव गुण गाण्या, मती अम्हा देई ॥धृ॥
कृपे शिवाच्या शक्तिरूप तव, अतर्क्य अवतार ।
तूच निर्मिशी या जगताला, तुझाच आधार ।
जगी रजावर तसा तमावर, तुझाच अधिकार ।
सत्त्व संकटी पडता करिशी, तमरज संहार ॥१॥
अंबा, दुर्गा, अन्नपूर्णा, तुळजामाता तूच ।
तू योगेश्वरी, तूच रेणुका, जोगेश्वरी तूच ।
काली, शाकंबरी, वैष्णवी, गौरी, लक्ष्मी तूच ।
अनेक रूपे अवतरशी तू, घरि आई तूच ॥२॥
अधिक्षेप तव कुठेहि न घडो, अमुच्या हातून ।
ठायी ठायी तुला पहाण्या, दे मंगल नयन ।
देव भेटण्या मार्ग तूच दे, माया भेदून ।
दीन जिवांची हीच विनंती, चरणा लागून ॥३॥
