रचना क्र. 313
श्री माणिकप्रभूंची आरती
श्री पेठेकाका · null
null
प्रभुप्रेममूर्ती । राजयोगमूर्ती ।
करूया माणिकप्रभु आरती ॥
जय जय माणिकप्रभु आरती
जय जय माणिकप्रभु आरती ॥ धृ ॥
दत्त जयांचे वाली ठरले ।
तप आचरुनी अभेद झाले ॥
साक्षात्कारे, ज्यांच्या ठायी,
दत्तप्रभु प्रगटती ॥१॥ करूया...
सकलमतांचे आदर केले ।
आर्तांना जे जीवन झाले ॥
भक्तकार्यकल्प्रद्रुम आजहि,
दीनजिवां ठरती ॥२॥ करूया...
