रचना क्र. 311
श्री सद्गुरुलीलामृताची आरती
श्री पेठेकाका · null
null
सद्गुरुलीलामृत ग्रंथा जय आद्यचरित्रा हो । जय जय आद्यचरित्रा हो ॥
चरित वर्णिशी, बोध घडविशी, ओवीरूपे बोध घडविशी ।
दीन साधकां हो ॥धृ॥
गोंदवल्याचे सगुण ब्रह्म तेरा श्लोकांत । नमिले तेरा श्लोकांत ॥
ब्रह्मानंदा आनंदित करि । शिष्यवृंदा आनंदित करि । पवित्र श्रीचरित ॥१॥
गुरुइच्छेने तेराऽध्यायी चरित्रविस्तार । प्रकटे चरित्रविस्तार ॥
गोपाळांची सद्गुरुसेवा । श्रवणी पठणी उद्धरि सेवा । ठेवा हा अमर ॥२॥
नरदेहाचे सार्थक करण्या दिला सुगम मार्ग । आम्हा दिला सुगम मार्ग ॥
नामेप्रेमे साध्य करावा । दाविशि कैसा साध्य करावा । इहलोकी स्वर्ग ॥३॥
