रचना क्र. 10
असो आता ऐसा धंदा
श्री तुकोबा
असो आता ऐसा धंदा ।
तुज आठवू (आळवू) गोविंदा ॥धृ॥
रक्षिता तू होसी जरी ।
तरी काय येरी करावे ॥१॥
काया वाचा मन पायी ।
राहे ठायी करू ते ॥२॥
तुका म्हणे गाइन गीती ।
रूप चित्ती धरूनिया ॥३॥
रचना क्र. 10
श्री तुकोबा
असो आता ऐसा धंदा ।
तुज आठवू (आळवू) गोविंदा ॥धृ॥
रक्षिता तू होसी जरी ।
तरी काय येरी करावे ॥१॥
काया वाचा मन पायी ।
राहे ठायी करू ते ॥२॥
तुका म्हणे गाइन गीती ।
रूप चित्ती धरूनिया ॥३॥