रचना क्र. 274
नित्य हरिकथा, नित्य नामावळी
श्री निवृत्तीनाथ · null
null
नित्य हरिकऽथा, नित्य नाऽमावळी ।
वैष्णवांचे कुळी, धन्य जन्म ॥धृ॥
म्हणोनि पंढरी, उपजावे संसारी ।
प्रत्यक्ष श्रीहरी, तीरी उऽभा ॥१॥
नित्यता दिवाळी, नाही तेथे द्वैत ।
नित्यता अच्युत तिष्ठतसे ॥२॥
निवृत्ति सधर, विष्णुमय सार ।
विठ्ठल आचार, पंढरीये ॥३॥
