रचना क्र. 266
तो हा उतरील पार
श्री तुकोबा
तो हा उतरील पार ।
भव दुस्तर नदीचा ॥धृ॥
म्हणउनि शरण जावे ।
सर्व भावे देवासी ॥१॥
बहु आहे करुणावंत ।
अनंत हे नाम ज्या ॥२॥
तुका म्हणे साक्षी आलो ।
तरी केले प्रगट ॥३॥
रचना क्र. 266
श्री तुकोबा
तो हा उतरील पार ।
भव दुस्तर नदीचा ॥धृ॥
म्हणउनि शरण जावे ।
सर्व भावे देवासी ॥१॥
बहु आहे करुणावंत ।
अनंत हे नाम ज्या ॥२॥
तुका म्हणे साक्षी आलो ।
तरी केले प्रगट ॥३॥