रचना क्र. 263
मग भवभय त्यासी
श्री माणिकप्रभू · null
null
मग भवभय त्यासी । बाधी कैसे ?॥धृ॥
अंतरी राम, बाहेरी राम ।
हेचि प्रतीती, जयासी असे ॥१॥
दृश्य पदार्थ, अशाश्वत मानुनी ।
आत्मारामी, डोलतसे ॥२॥
माणिक म्हणे, या रीतीचा योगी ।
संसारी परि, लिप्त नसे ॥३॥
