रचना क्र. 258
आमुचा आचार आमुचा विचार
श्री निवृत्तीनाथ · null
null
आमुचा आचार आमुचा विचार ।
सर्व हरिहर एक पुरे ॥१॥
धन्य माझा भाव सद्गुरु उपदेश ।
सर्व हृषीकेश दावियेला ॥२॥
हरिवीण दुजे नेणे जो सहजे ।
तया गुरुराजे अर्पियेले ॥३॥
हरि हेचि व्रत हरि हेचि कथा ।
हरिचिया पंथा मनोभाव ॥४॥
देहभाव हरी सर्वत्र स्वरूप ।
एका जन्मे खेप हरिली माझी ॥५॥
निवृत्ति हा हरि प्रपंच बोहरी ।
आपुला शरीरी हरी केला ॥६॥
