रचना क्र. 247
मानवा, शरण हरीला जाई रे
श्री निरंजन रघुनाथ · null
null
मानवा, शरण हरीला जाई रे ॥धृ॥
या वितभर पोटासाठी ।
किती करशिल रे खटपटी ।
पूर्वी लिहिलेसे ललाटी रे ॥१॥
काय भुललासी संसारा ।
पुत्र,धन, संपत्ती आणि दारा ।
अवघा मिथ्या मायेचा पसारा रे ॥२॥
नाही, स्थिरता या देहाला ।
भ्रम, कैचा पडला तुला ।
आता, येईल यमाचा घाला रे ॥३॥
पाहे, नीरंजनि रघुवीरा ।
तोडी, भवबंधन वागुरा ।
लावी, काळरिपूवरि तुरा रे ॥४॥
