रचना क्र. 209
भवाचे बंधन तोडी गुरुदेव
श्री विश्वनाथ महाराज
भवाचे बंधन तोडी गुरुदेव ।
दावी भावे देव, भक्ती केल्या ॥धृ॥
भक्ती करावया न लगे साधन ।
नको मी-तूपण द्वेष अंगी ॥१॥
मनाचे दुर्गुण काढून टाकावे ।
देवासी भजावे नियमित ॥२॥
म्हणे विश्वनाथ भजे जो देवासी ।
देव भेटे त्यासी गुरुकृपे ॥३॥
