रचना क्र. 191
सरले प्रारब्धाचे माप
श्री पेठेकाका · null
null
सरले प्रारब्धाचे माप ।
द्यावा देहा या निरोप ॥धृ॥
असू द्यावा कृपास्नेह ।
जरि ठेविला हा देह ॥१॥
देव भेटल्याकारणे ।
आता नाही येणे जाणे ॥२॥
आता हाक आल्यावरी ।
भेट होईल अंतरी ॥३॥
ब्रह्मचैतन्यांचे हाती ।
कृपा केली अवघ्या संती ॥४॥
देव व्हावासे सोयरा ।
तरी संतमार्ग धरा ॥५॥
महाभूतां विनवी दीन ।
परत घ्यावे आपुले दान ॥६॥
