रचना क्र. 182
संतांनी या कृपाळूपणे
श्री पेठेकाका · null
null
संतांनी या कृपाळूपणे, दिन हा दाखविला ॥
पहा या देवाची लीला ॥धृ॥
जागे करुनी, तम मिटवुनिया,
प्रकाश पसरविला ॥१॥
चिंता, कल्पित, गुंत्यामधुनी,
अलगद सोडविला ॥२॥
बुद्धीचा हा, खेळ थांबवुनि,
संभ्रम घालविला ॥३॥
बेत सदाचा, अहंपणाचा,
समूळ नाशियला ॥४॥
माझे जे, ते, घालवुनीया,
जीव मुक्त केला ॥५॥
भक्तामनीचा, भेद संपवुनि,
देवचि उरवीला ॥६॥
दीना दिसतो, संतरुपे हा,
आकारा आला ॥७॥
