रचना क्र. 163
गुरुवीण दुजा सापडेना देव
श्री विश्वनाथ महाराज · null
null
गुरुवीण दुजा सापडेना देव ।
ठेवा सत्यभाव गुरुपदी ॥१॥
गुरु दयावंत राजा ज्ञानियांचा ।
सकळ जीवांचा प्रेमी असे ॥२॥
गुरु करी कृपा पातकी उद्धरी ।
वसवी अंतरी नाम त्याच्या ॥३॥
म्हणे विश्वनाथ गुरु देव एक ।
गुरुपायी सुख सर्व आहे ॥४॥
