रचना क्र. 145
संतांचिया पायी माझा विश्वास
श्री तुकोबा · null
null
संतांचिया पायी माझा विश्वास ।
सर्वभावे दास झालो त्यांचा ॥१॥
तेचि माझे हित करिती सकळ ।
जेणे हा गोपाळ कृपा करी ॥२॥
भागलिया मज वाहतील कडे ।
त्यांचियाने जोडे सर्व सुख ॥३॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी ।
वचन न मोडी बोलिलो ते ॥४॥
