रचना क्र. 142
स्वामी देई हेचि दान
श्री स्वामीसुत महाराज · null
null
स्वामी देई हेचि दान ।
नित्य चरणांचे दर्शन ॥धृ॥
मज नको धन दारा ।
तुझ्या चरणी द्यावा थारा ॥१॥
मज ठेवावे भिकारी ।
सुखे करीन चाकरी ॥२॥
तुझे नाम माझी जोड ।
मुखि राहो तेचि गोड ॥३॥
तुझ्या चरणी माझा माथा ।
ऐसे करी दीनानाथा ॥४॥
तुझे नामी लागो छंद ।
मज द्यावे ‘दास’ पद ॥५॥
‘सुत’ मागे हेचि दान ।
तुझ्या चरणी होऊ लीन ॥६॥
