रचना क्र. 121
निंदक कामाचा कामाचा
श्री एकनाथ महाराज · null
null
निंदक कामाचा कामाचा ।
गडी आत्मारामाचा ॥धृ॥
निंदक आमुची काशी ।
आमुची पातके अवघी नाशी ॥१॥
निंदक आमुची गंगा ।
आमुची पातके नेते भंगा ॥२॥
निंदक आमुचा सखा ।
आमुची वस्त्रे धुतो फुका ॥३॥
निंदक आमुचा गुुरू ।
एका जनार्दनी थोरू ॥४॥
