रचना क्र. 2
नामाची आरती
श्री पेठेकाका
गाऊ नामाची आरती ।
ज्याने देव दिला हाती ॥ धृ ॥
आहत तैसे अनाहताचे ।
शब्दरूप हे बीज जगाचे ॥
देत स्मरण चित्ती ॥१॥
नव्हे अक्षरे, मंत्र नसे हे ।
सगुणरूप भगवंत असे हे ॥
सिद्ध, संत वरिती ॥२॥
निरुपाधिक मार्गांचा राजा ।
कुणाच्याहि हे येई काजा ॥
येथ भेद मिटती ॥३॥
असो कुणाही देवरुपाचे ।
उन्मन करिते घेई त्याचे ॥
भक्त दीन तरती ॥४॥
