रचना क्र. 90
आता रामा ऐशी कृपा हो करावी
श्री कृष्णदास महाराज · null
null
आता रामा ऐशी कृपा हो करावी ।
देहासी विसरावी बुद्धी माझी ॥१॥
छाया उकिरडा पडो, पडो की विमानी ।
तैशी देहामनी चिंता नको ॥२॥
कल्पवरी राहो किंवा आजि जावो ।
कोणाचेही होवो उदरभरण ॥३॥
जन्मोजन्मी मज भक्तिच घडावी ।
कृष्णदासा द्यावी हीच जोडी ॥४॥
