रचना क्र. 51
ऐसे काही करी काम
श्री आनंदसागर · null
null
ऐसे काही करी काम ।
जेणे साह्य होय राम ॥१॥
ऐसा करी काही धंदा ।
जेणे आवडे परमानंदा ॥२॥
ऐसी करी काही कृती ।
रामापायी राहे वृत्ती ॥३॥
ऐसा धरी काही मार्ग ।
जेणे हाता चढे स्वर्ग ॥४॥
हरी म्हणे मानी मना ।
गुरुचरणाच्या खुणा ॥५॥
