रचना क्र. 9
श्री हरिपाठाची आरती
श्री पेठेकाका
आरती हरिपाठा । झाल्या सोप्या भक्तिवाटा ॥
आरती हरिपाठा ॥धृ॥
सत्तावीस सुमनांची । कल्याणार्थ माळ झाली ।
ज्ञानदेवे कृपा केली । भक्तां नित्यसंध्या झाली ॥१॥
हरिपाठ संकीर्तन । देवकीर्तीचे गायन ।
मुखे हरि उच्चारण । थोर घडते साधन ॥२॥
नाम हाचि दिव्य मार्ग । सुखे घरा येई स्वर्ग ।
द्वैत, भेद होई त्याग । सर्व विष्णुमय जग ॥३॥
जीवनाचे सार वाटिले । गूढ तत्त्व सोपे केले ।
दीन जीव धन्य झाले । हरिनामे उद्धरले ॥४॥
