रचना क्र. 4
जलदेवतांची आरती
श्री पेठेकाका
जय गंगे जय कृष्णे, जय भागीरथी ।
तृषार्त तृप्त करिता जगातले अतिथी ॥ धृ ॥
पंचतत्त्वे जीव आकारा आले ।
पृथ्वी अग्नी वायू तृष्णे व्याकुळले ।
प्रसन्न जलतत्त्वाने जीवन दिधले ।
तुमच्या रूपे प्रकटुनि सर्वां उद्धरिले ॥ १ ॥
जीवनगंगा तुम्ही आम्हा हे कळु दे ।
कृपाचिंतने शुद्ध चित्त होऊ दे ।
कृतज्ञतेने जीवन पावन जगू दे ।
दीनभक्ता नित्य भान हे टिकु दे ॥ २ ॥
